पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; २० टक्के पाणीकपात अटळ, कुठे कशी अन् कधी होणार अंमलबजावणी? निर्णय लवकरच

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमी असल्याने पुणे शहरात २० टक्के पाणीकपात करावीच लागणार आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांतील पाणीपुरवठ्याची स्थिती, उपलब्ध दाब आणि वितरणातील तफावत लक्षात घेऊन विभागनिहाय कपातीचे धोरण ठरविण्यात येणार आहे. याबाबतचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर एक-दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी बुधवारी दिली.

सरकारने २० टक्के पाणीकपात करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे कपात करायची की नाही, याबाबत कोणताही संभ्रम नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र, कपात कोणत्या पद्धतीने करायची, यावर पुणे महापालिका प्रशासनाचा अभ्यास सुरू आहे. काही भागांत पाणीपुरवठा तुलनेने चांगला आहे, तर काही भागांत आधीपासूनच कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे संपूर्ण शहरासाठी एकच धोरण लागू करण्याऐवजी परिस्थितीनुसार वेगवेगळे पर्यायांता विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *