सोन्या-चांदीच्या दरात मोठे उलटफेर झाले आहेत. बुधवारी मौल्यवान धातुच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. तर, आजदेखील ही घसरण कायम आहे. गुरुवारी 19 नोव्हेंबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्सवर दोन्ही मौल्यवान धातुच्यां किमती घसरल्या आहेत. या दरम्यान, चांदीच्या तुलनेत सोन्याच्या दरात अधिक घसरण नोंदवली गेली आहे. सोनं 1.28 लाख प्रति तोळावर स्थिरावले आहे. या घसरणीनंतर सोनं उच्चांकीनंतर तब्बल 65 हजारांनी स्वस्त झालं आहे.
एमसीएक्सवर गुरुवारी वायदा बाजार सुरू होताच 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,28,310 रुपयांवर पोहोचला आहे. तर, गुरुवारी सोन्याचा दर घसरून 1,29,814 रुपये प्रतितोळा वर स्थिरावला होता. या हिशोबाने बाजार सुरू होताच सोन्याचे दर 1504 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहेत.
गुरुवारी सकाळच्या सत्रात एमसीएक्स सोन्याच्या दरात झालेल्या या घसरणीनंतर, 24-कॅरेट सोन्याचे वायदे त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षाही स्वस्त झाले आहेत. वास्तविक पाहता, यावर्षी 29 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 1.93 लाख रुपयांच्या उच्चांकापर्यंत झपाट्याने वाढला होता आणि आता, सध्याच्या किमतीच्या तुलनेत एक मोठी घसरण दिसून येत आहे. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा 65,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
सोन्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर, चांदीच्या दराने गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले आहे आणि ज्यांनी जास्त दरात खरेदी केली होती त्यांना मोठा फटका बसला आहे. गुरुवारी, 4 डिसेंबर रोजी मुदत संपणाऱ्या 1 किलो चांदीचा भाव 1,50,321 रुपयांपर्यंत घसरला. इतर उच्चांकांच्या तुलनेत, चांदीचा भाव आता 4,20,048 रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून घसरून 2,60,727 रुपये प्रति किलो झाला आहे.
सोन्याचा दर
1 ग्रॅम- 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट
1 ग्रॅम 13,069 11,980 9,802
8 ग्रॅम 1,04,552 95,840 78,416
10 ग्रॅम 1,30,690 1,19,800 98,020
100 ग्रॅम 13,06,900 11,98,000 9,80,200
बुधवारी चांदीसोबतच सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आणि ही घसरण एमसीएक्स फ्युचर्स ट्रेडिंगपासून ते दिल्लीच्या सराफा बाजारांपर्यंत दिसून आली. आयबीजेएच्या वेबसाइटनुसार, 24-कॅरेट सोन्याचा भाव 3,000 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,31,505 रुपये झाला. दरम्यान, 22 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 2,900 रुपयांनी घसरून 1,20,459 रुपये झाला. 18-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 98,629 रुपये होता.
या महिन्यात चांदी घसरली
चांदीच्या वाढत्या किंमतीचा फुगा नोव्हेंबरमध्येही फुटला आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, 30 ऑक्टोबर रोजी, एमसीएक्सवरील चांदीचा वायदा भाव ₹179,132 प्रति किलोवर स्थिरावला होता. तर गुरुवार, 19 नोव्हेंबर रोजीचा चांदीचा भाव पाहता, हा ₹19,811 प्रति किलोवर स्थिरावला आहे.
