चार दिवसांपूर्वीच एका लहान मुलीला रात्रीच्या वेळेस एसटी मधून उतरवल्याप्रकरणी चालक वाहकाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निलंबन केलं होते. यावेळी प्रवाशांजवळ महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्याजवळ सौजन्याने वागा अन्यथा कारवाई केली जाईल, असा थेट इशाराच मंत्रीमहोदयांनी दिला होता. या घटनेला चार दिवस होत नाही तोच आता कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी डेपो आगारातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारकऱ्यांना पंढरीला घेऊन निघालेल्या एसटीचा चालकाने चक्क मद्यप्राशन करून करून चार तास गाडी थांबवून चक्क वारकऱ्यांनाच वेठीस धरल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
दापोली आगारातील चालकाने मद्यप्राशन केल्याचा प्रकार
अखेर दापोली भाजपाच्या आक्रमक पवित्र्यानंतर त्या चालकावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार दापोली येथून वारकऱ्यांना पंढरीला घेऊन गेलेल्या दापोली एसटीत घडला. दापोली आगारातील चालकाने मद्यप्राशन केल्याचा प्रकार आळंदी येथे दोन दिवसापूर्वी सकाळी सातच्या सुमारास घडला.
