सातारा झेडपीतील सत्तासंघर्षाचा बदला जिल्हा बँकेत? अध्यक्ष निवडीत मोठ्या घडामोडी, भाजपला बाजूला ठेवून सत्ता स्थापनेच्या हालचाली

जिल्हा बँक अध्यक्षपदाची उद्या (बुधवारी) निवड आहे. निवडणुकीला काही तास शिल्लक असताना साताऱ्यात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. भाजपला अध्यक्षपद हवे आहे, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने झेडपीतील अपमानाचा बदला घेण्याची तयारी केली आहे. त्यामुळे उद्या (बुधवारी) अध्यक्ष भाजपचा होणार की जिल्हा परिषदेसारखा पुन्हा राडा होणार? याकडे सातारा जिल्ह्यातील सहकार वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची बुधवारी निवड आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात राजकीय खलबते सुरू आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार नितीन पाटील यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. भाजपला वगळून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाल्याने नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

जयकुमार गोरे यांचा भाजपच्या अध्यक्षासाठी निर्धार, पण..

भाजपला बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची बैठक झाल्याने वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचाच करण्याचा चंग बांधला आहे. तसेच आपल्याच मर्जीतला अध्यक्ष व्हावा असा देखील त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नाला भाजपमधील दिग्गज नेत्यांचा सुप्त विरोध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *