“एके दिवशी मी त्या महिलेला मॅक्सी घालून झाडू मारताना पाहिले होते. तेव्हाच माझ्या मनात वाईट विचार आले. मी वारंवार तिच्या घराजवळ जाऊन लपून तिला पाहत असे. एका रात्री संधी मिळताच मी तिच्या घरात शिरलो. पती-पत्नी वेगवेगळे झोपले होते. आवाजामुळे पती जागा झाला, तेव्हा मी त्याची हत्या केली. त्यानंतर महिलाही जागी झाली, म्हणून मी तिचीही हत्या केली आणि त्यानंतर तिच्या बॉडीवर चार-पाच वेळा लैंगिक अत्याचार केले.” पती-पत्नीची हत्या केल्यानंतर महिलेच्या शवावर अत्याचार करणाऱ्या आरोपीने ही निर्लज्ज कबुली दिली आहे. रविवार १५ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशमधील कन्नौज पोलिसांनी आरोपीच्या दोन्ही पायांवर गोळ्या झाडून त्याला अटक केली.
कन्नौजमधील दुहेरी हत्या ४ नोव्हेंबरच्या रात्री घडली होती. धक्कादायक म्हणजे आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारचा गुन्हा केला होता, त्यावेळी त्याने एका मायलेकीची हत्या केली होती. ती घटना गुरसहायगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.
नेमकं काय घडलं?
५ नोव्हेंबरच्या सकाळी जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असलेल्या एका निवासस्थानी पती-पत्नीचे मृतदेह आढळले होते. त्यांची २ वर्षांची मुलगी आपल्या वडिलांच्या पार्थिवाशेजारी बसून रडत होती. एक नातेवाईक घरी आला असता, या दुहेरी हत्येचा प्रकार उघडकीस आला होता.
तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती दिसली. त्याची ओळख योगेश सिंग राजपूत (वय २५, ऊर्फ ‘पंगा’) अशी पटली. तो तालग्राममधील भोजापूर गावचा रहिवासी आहे. रविवारी पोलिसांची योगेशशी चकमक झाली, तेव्हा त्याच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
