एरवी ज्याला बघितल्यावरही आपल्या अंगाचा थरका उडतो मात्र अलीकडे होणारी जंगलतोड अनेक विकासकामे यामुळे जैवविविधता निसर्ग संपदा यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. अशातच कोकणात चिपळूण तालुक्यात उमरोली येथे चक्क ब्लॅक पँथर च विहिरीत पडल्याने अडचणीत सापडला होता. ब्लॅक पँथरचे पिल्लू विहिरीत पडल्याने हे पिल्लू धोक्यात आला होतं. मात्र या घटनेची खबर मिळताच रत्नागिरी, चिपळूण वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत विहिरीत पडलेल्या ब्लॅक पँथरला यशस्वीरित्या रेस्क्यू करत विहिरीत अडकलेल्या ब्लॅक पँथर पिल्लाला जीवदान दिले आहे.
ब्लॅक पँथरच अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध
कोकणात घडलेल्या या घटनेवरून ब्लॅक पँथरच अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, चिपळूण मौजे उमरोली येथील भडवळकरवाडी येथे ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मिळ काळ्या बिबट्याची यशस्वी सुटका करत, एक वर्षाच्या मादी प्रकारातील काळ्या बिबट्याला वन विभागाच्या बचाव पथकाने अथक प्रयत्नांनंतर सुरक्षितपणे बाहेर काढले. 17 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. उमरोली येथील भडवळकरवाडी येथे विष्णू अर्जुन भडवळकर यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये दुर्मिळ काळा बिबट्या पडल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य योगेश खांडेकर यांनी वनरक्षक राहुल गुंठे यांना दिली.
