गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाल्याने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
लतादीदींना करोनाची सौम्य लक्षणे आहेत. मात्र, त्यांचे वय ९२ वर्षे असल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे. लतादीदींची प्रकृती ठीक आहे. करोनातून बरे होण्यासाठी किमान सात दिवस लागतात, त्यामुळे लतादीदींना अजून रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील, असेही त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन दिवसांमध्ये करोनाचा संसर्गदर २३ व २४ टक्के राहिला असून प्रतिदिन २० हजार ते २२ हजार नव्या रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. डेल्टा व ओमायक्रॉन या दोन्ही उत्परिवर्तित विषाणूंची बाधा झालेले रुग्ण आढळल्याने निर्बंधातही वाढ करावी लागत आहे. पण, शहरामध्ये टाळेबंदी लागू केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये दिल्लीत हाहाकार माजला होता व रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी खाटा मिळत नव्हत्या. तिसऱ्या लाटेत इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही. करोनाच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असून रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी आहे. मात्र, दक्षता घेण्यासाठी निर्बंध कठोर करावे लागत असल्याचे केजरीवाल म्हणाले.
पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांची बैठक
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी घेतलेल्या बैठकीनंतर, आता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत. ही बैठक गुरुवारी होण्याची शक्यता असून मोदींनी दोन दिवसांपूर्वी करोनाच्या तज्ज्ञ गटाशी चर्चा करून देशातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला होता.
शिखर येत्या आठवडय़ात – जैन
दिल्लीतील करोनाच्या लाटेचे शिखर पुढील दोन-तीन दिवसांत, फारतर पुढील आठवडय़ात गाठले जाईल. त्यानंतर करोनाच्या वाढणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होत जाईल. पण लोकांनी दक्षता घेणे गरजेचे असल्यामुळे शनिवार-रविवारी संचारबंदी लागू केली जाणार असल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. गेल्या वर्षी १५ मेनंतर पहिल्यांदाच दिल्लीतील करोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ६५ हजार ८०६ वर पोहोचली आहे. १५ मे रोजी ही संख्या ६६ हजार २९५ होती.
