कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेस या गाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने खोळंबली आहे. त्यामुळे या मार्गावरील अन्य गाड्यांना उशिर झाला आहे. चिपळूण येथे जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने गाडीला बिलंब झाला आहे.
दादर- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेनुसार चालली होती. मात्र, चिपळूण नजिकच्या कापसाळ दरम्यानच्या बोगद्याजवळ गाडीच्या इंजिनात बिघात झाला. त्यामुळे दुरुस्तीच्या कामात अथळा निर्माण झाला. दुसरे इंजिन येईपर्यंत गाडीला बिलंब झाला. त्यामुळे कोकण रेल्वे मार्घावरील अनेक गाड्या खोळंबल्यात. या खोळंबलेल्या गाड्या आता उशिराने धावत आहेत.
जनशताब्दीच्या इंजितनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक गाड्या नियोजित वेळापत्रानुसार उशिराने धावत आहेत.
