घरात सगळे झोपले होते, लॅच लॉक तोडून दरोडेखोरांनी आत प्रवेश केला आणि…

भिवंडीतील शहापूर येथे आपल्या घरी झोपलेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगावरून दरोडेखोरांनी चक्क दोन लाखाचे ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत घराच्या दरवाज्याला लावलेला लॅच लॉक तोडून दरोडेखोर घरात घुसले. हे दरोडेखोर घरात घुसताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या मदतीने या दरोडेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *