राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्चस्व कायम राखले आहे. जिल्हा बँकेच्या संचालकापदाच्या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा आधीच बिनविरोध निवडून आल्यात. तर सात पैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची मतमोजणी आज झाली. यावेळी सात पैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा बँकेवर आपली सत्ता काबीज केली आहे.
सुनील चांदेरे, आमदार अशोक पवार, विकास दांगट अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची नावे आहेत तर बिनविरोध निवडून आलेल्या 14 संचालकांपैकी 13 संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. दरम्यान, या निवडणुकीत भाजप पाठिंबा्याने एक सदस्य निवडून आला आहे. हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. बँक पतसंस्थांच्या गटामधून भाजप पुरस्कृत प्रदीप कंद 11 मतांनी विजयी झाले आहेत.
