शिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह आल्याने मनमाडच्या इंडियन हायस्कुलमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ही शाळा आता तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
मनमाडच्या इंडियन हायस्कूल शाळेतील एका शिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने विद्यार्थी आणि पालक धास्तावले आहे. शाळा प्रशासनाने तातडीने शाळेला तीन दिवस शाळेला सुट्टी जाहीर केली तर पालिकेने शाळेचा परिसर सॅनिटाइझ केला. हा शिक्षक अकरावी आणि बारावी वर्गाला शिकवतात. त्यांच्या संपर्कात आलेले विद्यार्थी आणि शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शाळा तीन बंद ठेवण्यात आली असून अकरावी आणि बारावीचे वर्ग ऑनलाईन भरविण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे. तसेच संपर्कात आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना त्रास जाणवल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन शाळेकडून करण्यात आले आहे.
