गोंडवाना विद्यापीठाची हिवाळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार

गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील हिवाळी २०२१ ची लेखी परीक्षा १० जानेवारी २०२१ पासून ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा बहुपर्यायी व ओएमआर शिट पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठवण्यात येणार आहे.

मागील दोन वर्षे करोनामध्ये गेल्याने देशातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. नुकत्याच गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या सभा पार पडली. या सभेत ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हिवाळी २०२१ ची लेखी परीक्षा १० जानेवारी २०२१ पासून ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा बहुपर्यायी व ओएमआर शिट पद्धतीने घेण्यात आहे. विद्यार्थ्यांना एका तासाच्या अवधीची परीक्षा घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिकेत ५० बहुपर्यायी प्रश्न राहणार असून प्रत्येक प्रश्नाला १ गुण असे एकूण ५० गुणांचा पेपर होणार आहे. यामध्ये चुकींच्या उत्तरासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाही. करोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून परीक्षा केंद्रांवर गर्दी टाळता यावी यासाठी चार पाळीत म्हणजे सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत परीक्षा घेतल्या जाणार आहे. गोंडवाना विद्यापीठाने सीजीएस अभ्यासक्रमातील बदल करुन सीबीसीएस अभ्यास प्रणाली शैक्षणिक सत्र २०१६-१७ पासून अंमलात आणलेली आहे. त्याअनुषंगाने जुन्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रम पास करण्याकरिता विद्यापीठ समितीच्या सूचनेनुसार संधी देण्यात आली आहे.

हिवाळी २०२१ ची लेखी परीक्षा १० जानेवारी २०२१ पासून ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा बहुपर्यायी व ओएमआर शिट पद्धतीने घेण्यात आहे. विद्यार्थ्यांना एका तासाच्या अवधीची परीक्षा घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिकेत ५० बहुपर्यायी प्रश्न राहणार असून प्रत्येक प्रश्नाला १ गुण असे एकूण ५० गुणांचा पेपर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *