मतभेदांमुळे पती-पत्नी म्हणून सोबत राहणे शक्य नसले, तरी आपल्या मुलासाठी आई-वडिलांची जबाबदारी कधीही संपत नाही, या भावनेतून आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित दाम्पत्याने घटस्फोट घेतानाही पालकत्वाचे नाते जपण्याचा आदर्श घालून दिला. दहा वर्षांच्या मुलीचे शिक्षण, संगोपन, सुट्ट्या आणि सणासुदीच्या भेटींपासून ते भविष्यातील तिच्या सुरक्षिततेपर्यंत सर्व बाबींचा ‘पेरेंटिंग प्लॅन’ तयार करून दोघांनी परस्परसंमतीने घटस्फोट घेतला. पुणे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश ए. बी. यादव यांनी या निर्णयाचे कौतुक करून दावा निकाली काढला.
परस्पर संमतीने घटस्फोट
या दाम्पत्याचे बारा वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहात लग्न झाले होते. उच्च पदांवर कार्यरत असलेले पुण्यातील हे पती-पत्नी आणि १० वर्षांची मुलगी असा त्यांचा परिवार होता. मात्र, एकमेकांशी पटत नसल्याने त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मागील साडेचार वर्षांपासून दोघे विभक्त राहत होते. अखेर त्यांनी परस्परसंमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला मतभेदांमुळे पती-पत्नी म्हणून सोबत राहणे शक्य नसले, तरी आपल्या मुलासाठी आई-वडिलांची जबाबदारी कधीही संपत नाही, या भावनेतून आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित दाम्पत्याने घटस्फोट घेतानाही पालकत्वाचे नाते जपण्याचा आदर्श घालून दिला. दहा वर्षांच्या मुलीचे शिक्षण, संगोपन, सुट्ट्या आणि सणासुदीच्या भेटींपासून ते भविष्यातील तिच्या सुरक्षिततेपर्यंत सर्व बाबींचा ‘पेरेंटिंग प्लॅन’ तयार करून दोघांनी परस्परसंमतीने घटस्फोट घेतला. पुणे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश ए. बी. यादव यांनी या निर्णयाचे कौतुक करून दावा निकाली काढला.
परस्पर संमतीने घटस्फोट
या दाम्पत्याचे बारा वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहात लग्न झाले होते. उच्च पदांवर कार्यरत असलेले पुण्यातील हे पती-पत्नी आणि १० वर्षांची मुलगी असा त्यांचा परिवार होता. मात्र, एकमेकांशी पटत नसल्याने त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मागील साडेचार वर्षांपासून दोघे विभक्त राहत होते. अखेर त्यांनी परस्परसंमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला
आई-वडिलांच्या पश्चात पालनपोषणाचेही नियोजन
विशेष म्हणजे, भविष्यात दुर्दैवाने आई किंवा वडील किंवा दोघांचाही मृत्यू ओढवल्यास, मुलगी सज्ञान होईपर्यंत तिचा सांभाळ कोण आणि कसा करणार, याचे कायदेशीर नियोजनसुद्धा या आराखड्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
“घटस्फोट पती-पत्नीचा होतो; आई-बाबांचा होत नाही. पालकांमधील वादाचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. मुलांना दोघांचेही प्रेम आणि सहवास आवश्यक असतो. त्यामुळे मुलांच्या हिताचे निर्णय एकत्र घेता यावेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पेरेंटिंग प्लॅनच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचा वापर करून पालकांनी सामंजस्याने तोडगा काढावा.” अशी प्रतिक्रिया दाम्पत्याच्या वकील अॅड. वंदना घोडेकर यांनी दिली आहे.
