पालकमंत्र्यांच्या बंगल्याबाहेरच मध्यरात्री मद्यपींचा धिंगाणा! सुरक्षारक्षकांशी झटापट अन् दगडफेक, मंत्री संजय शिरसाटांचा पोलीस प्रशासनावर संताप

छत्रपती संभाजीनगरमधील गोलवाडी परिसरात असलेल्या पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर काल गुरुवारी मध्यरात्री काही समाजकंटकांनी प्रचंड गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मद्यपान करत असलेल्या दोन तरुणांना सुरक्षा रक्षकांनी हटकल्याचा राग मनात धरून, या तरुणांनी थेट बंगल्याच्या दिशेने दगड आणि काचेच्या बाटल्या फेकून मारल्या. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, काल गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास पालकमंत्र्यांच्या घराच्या मागील बाजूला दोन तरुण दारू पित बसले होते. ड्युटीवर असलेल्या सुरक्षा पोलिसांनी हा प्रकार पाहताच त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितलं. मात्र, शांतपणे जाण्याऐवजी दोन्ही तरुणांनी आरडाओ

दोन्ही संशयित तरुणांना ताब्यात घेतलं

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून इतर सुरक्षा रक्षकांनी धाव घेत या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्लेखोर आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली, ज्यात दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी दोन्ही संशयित तरुणांना ताब्यात घेतलं. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मंत्री शिरसाट यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तपासाबाबत सूचना दिल्या. दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. रोहित भुताळे, शिवम गायकवाड आणि प्रतीक कुटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.रडा करत पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पाहता पाहता वाद इतका वाढला की या तरुणांनी घराच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला आणि हाताला मिळतील ते दगड व रिकाम्या बाटल्या बंगल्यावर भिरकावल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *