विदेशी सिगारेटची विक्री करणाऱ्यास अटक

प्रतिबंधित तंबाखू आणि विदेशी सिगारेटविक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून १४ हजारांच्या प्रतिबंधित विदेशी सिगारेट आणि तंबाखू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (११ नोव्हेंबर) दुपारी सूसगाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ करण्यात आली.

 नंदकिशोर पुशाराम शर्मा (वय ४४, रा. सूस गाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस नाईक सुरेश जायभाये यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना माहिती मिळाली, की सूसगाव ग्रामपंचायतीजवळ एक जण टेम्पो घेऊन आला आहे. तो प्रतिबंधित तंबाखू आणि विदेशी सिगारेट विकत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून १४ हजार २५ हजार रुपयांची तंबाखू आणि विदेशी सिगारेट जप्त केली. साडेतीन लाख रुपयांचा एक टेम्पोदेखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *