नाल्यात सहा महिन्याच्या बाळाची बॉडी अन् लाल बॅग, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु; बॅगेचं गूढ कायम

नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नागपूरच्या विणकर कॉलनी परिसरातील एका नाल्यात सुमारे सहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे, मृतदेहाजवळ लाल रंगाची एक बॅगही आढळून आली आहे. त्यामुळे या घटनेचं गूढ अधिकच वाढलं आहे. अखेर हा भ्रूण नाल्यात कोणी आणि कोणत्या कारणाने फेकला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, काल बुधवारी दुपारच्या सुमारास विणकर कॉलनी येथील नाल्यात भ्रूणाचा मृतदेह पडून असल्याचं स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आलं. सुरुवातीला नागरिकांना नेमकं काय पडलं आहे, हे समजलं नाही. मात्र, जवळ जाऊन पाहिलं असता तो भ्रूण असल्याचं स्पष्ट झालं. त्याच्या मृतदेहाजवळच लाल रंगाची एक बॅग पडलेली होती. दरम्यान, नाल्यातील भ्रूणाला भटक्या कुत्र्यांनी ओरखडायला सुरुवात केली होती. हे दृश्य पाहून नागरिक हादरले. काही वेळातच परिसरात ही बातमी पसरली आणि घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *