नायगाव स्टेशनवर बॅड टच, छेडछाडीला विरोध करताच 20 वर्षीय तरुणीला लोकलखाली ढकललं, चाकाखाली आल्याने डावा हात गमावला

छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला लोकलखाली ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई महानगरातील Naigaon Railway Station Crime घडल्याचे समोर आले आहे. बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये ४ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. फलाटावरुन रुळांवर पडल्यानंतर ट्रेनच्या चाकाखाली आल्याने खाली आल्यामुळे पीडितेचा डावा हात कोपरापासून कापावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, नायगाव स्थानकात लोकल आल्यानंतर आरोपीने तिच्या छातीजवळ हात लावून विनयभंग केला. याला विरोध करत तरुणीने त्याला चप्पल मारली, त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. लोकल स्टेशनवर थांबलेली असताना आरोपीने अचानक फलाटावरुन तरुणीला दोन्ही हातांनी जोरात धक्का दिला. त्यामुळे ती दोन डब्यांच्या मधून रेल्वे रुळांवर पडली. प्लॅटफॉर्मवर चढून येण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकल अचानक सुरु झाल्यामुळे तिचा डावा हात चाकाखाली आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *