मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीला अटक झाल्यानंतर आता इंद्राणीने मुलगा मिखाईल याच्या हत्येसाठी मारेकऱ्याला सुपारी दिल्याचे समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणी मुखर्जीने मिखाईलला दोन ते तीनवेळा मारण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये मिखाईलच्या हत्येसाठी मारेकऱ्याला सुपारी दिल्याचेही समोर आले आहे.
गुवाहाटी येथे राहत असलेल्या मिखाईलने यापूर्वीच पोलिसांनी इंद्राणीने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितलेले आहे. यामुळे पोलिस आता इंद्राणी, तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि चालक श्याम राय यांच्याविरोधात नव्याने गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. सध्या पोलिस कोठडीत या तिन्ही आरोपींना आज (सोमवार) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
