दहीहंडीवरील जाचक अटींबाबत गोविंदा मंडळांमध्ये संभ्रमावस्था

दहीहंडीवरील जाचक अटींबाबत गोविंदा मंडळांमध्ये संभ्रमावस्था

दहीहंडीवरील जाचक अटींबाबत अद्याप मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा मंडळांमध्ये संभ्रमावस्था आहे. यासंदर्भात मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी मंडळांनी शनिवारी घेतलेल्या बैठकीत दोन्ही शहराच्या मंडळांनी स्वतंत्र निर्णय घेतला आहे.

जाचक अटी असल्यामुळे ठाण्यातील गोविंदा पथक ठाण्याबाहेर हंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत. त्यांनी फक्त ठाण्यातच हंडी फोडण्याचा निर्णय घेतला आहे, तर अटींबाबत अजूनही संभ्रमावस्था असली तरी दहीहंडी साजरी करणार असल्याचं मुंबईच्या दहीहंडी मंडळानं स्पष्ट केलं आहे.

सरकारनं दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला असताना दुसरीकडे या सणावर जाचक अटी घातल्या आहेत. दहीहंडी 20 फुटांपेक्षा जास्त नको, शिवाय 12 वर्षांखालील मुलांना दहीहंडी उत्सवात सहभागी होता येणार नाही अशा अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींमुळे ठाणे आणि मुंबई दहीहंडी मंडळांनी निर्णय घेतला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *