प्रत्येक कर्मचाऱ्याला बीएमडब्ल्यू देण्यासाठी धडपडणारा मालक

प्रत्येक कर्मचाऱ्याला बीएमडब्ल्यू देण्यासाठी धडपडणारा मालक

एकीकडे जगभरातील कंपन्या नंबर वन बनण्यासाठी धडपडत आहेत, तर दुसरीकडे असा एक कंपनीचा मालक आहे, ज्याला पैसा कमवायचा आहे, पण केवळ एकट्यासाठी नाही, तर आपल्या कामगारांसाठी.

आपल्या कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याने बीएमडब्ल्यूतून फिरावं, असं या मालकाचं स्वप्न आहे.

गिरीष मातृभूतम असं या मालकाचं नाव आहे. गिरीष हे हेल्पडेस्क सॉफ्टवेअर कंपनी फ्रेशडेस्कचे सहसंस्थापक आहेत.

गिरीष यांना तमाम पैसा कमवायचा आहे. या पैशातील भाग कंपनीतील सर्व कामगारांना द्यायचा आहे.

“एखादी कंपनी ही कामगारांच्या मेहनतीमुळेच सर्वोच्च स्थानी पोहोचत असते. त्यामुळेच कमाईतील निवडक हिस्सा कामगारांना  मिळायलाच हवा”, असं गिरीष यांचं म्हणणं आहे.

‘इकॉनॉमिक्स टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गिरीष मातृभूतम कामगारांबद्दल भरभरून बोलले.

” मलाही खूप पैसा कमवायचा आहे. पण तो फक्त संस्थापक म्हणून नाही. मला माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला  भरभरून कमावताना पाहायचं आहे. त्यांच्यामुळेच माझी कंपनी उभी राहिली आहे”, असं गिरीष म्हणाले.

“इतकंच नाही तर ज्यावेळी मी ‘फ्रेशडेस्क’ कंपनी सुरू करत होतो, त्यावेळीच माझ्या पत्नीला सांगितलं होतं की, ही कंपनी मला फक्त माझ्यासाठी बीएमडब्ल्यू खरेदी करण्यासाठी स्थापन करत नाही, तर मी खूप कमवून कर्मचाऱ्य़ांना त्याचा हिस्सा शेअर करू”, असंही गिरीष यांनी सांगितलं.

फ्रेशडेस्क ही एक क्लाऊडबेस हेल्पडेस्क सॉफ्टवेअर कंपनी आहे. ऑक्टोबर 2010 मध्ये या कंपनीची सुरुवात झाली. ही कंपनी सुमारे 40 हजार ग्राहकांना  सेवा देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *