20 वर्षीय विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न

20 वर्षीय विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 20 वर्षीय विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. सारिका असं या 20 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. 3 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी सारिकाला जाळण्याचा प्रयत्न झाल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.

लग्नात 2 लाख रुपये, 3 तोळे सोनं हुंडा

 मूळची परभणी जिल्ह्यातील एका खेडेगावात राहणाऱ्या सारिकाचा विवाह एक वर्षापूर्वी अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव इथं रहाणाऱ्या हनमंत हुंडे याच्याशी झाला होता. लग्नाच्या वेळी 2 लाख हुंडा आणि 3 तोळे सोनं मुलीच्या आई वडिलांनी हनुमंतला दिलं होतं.

मोबाईलच्या दुकानासाठी आणि पुण्यात राहण्यासाठी हुंड्याची मागणी

 

मात्र, लग्नानंतर वेळोवेळी मोबाईलचे दुकान पुण्यात टाकण्यासाठी आणि पुण्यात राहण्यासाठी हनुमंतने सारिकाच्या आई-वडिलांकडे पैशांची मागणी सुरु केली. मुलीच्या घरची परिस्थिती बेताची असल्यानं त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तिला घरातच जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलीच्या आई वडिलांनी केला आहे.

आरोपीला तात्काळ अटक करा, महिला आयोगाची मागणी

 

याबाबत मुलीच्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असली तरी ही घटना दुर्दैवी आहे आणि यातील आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी महिला आयोगाच्या सदस्या आशा भिसे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *