पाटण्यामध्ये रेल्वे अपघातात ५ जणांचा मृत्यू

पाटण्यातील राजेंद्र नगर टर्मिनल स्थानकात बुधवारी रात्री रेल्वे रुळ ओलांडताना झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या पाटना-इस्लामपूर पॅसेंजर ट्रेनने पाचजणांना उडवले.

या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

रात्रीची वेळ असल्याने रुळ ओलांडताना समोरुन ट्रेन येत असल्याचा अंदाज आला नसावा. पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ ए.के.रजाक यांनी ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *