पावसानं पाठ फिरवल्यानं पाणीकपात आज मध्यरात्री पासून लागू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ आठ महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मुंबईत 20 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पाणीकपात आज मध्यरात्री पासून लागू होणार आहे.
निवासी, औद्योगिक आणि व्यापारी या सर्व क्षेत्रांत पाणीकपात करण्यात येणार आहे. याशिवाय जलतरण तलाव, मॉल्स, वातानुकुलित संयंत्र, बाटलीबंद पाणी, शीतपेये कारखाने, तारांकित हॉटेल्स, रेसकोर्स इत्यादी ठिकाणी होणारा पाणीपुरवठ्यावर ५० टक्क्यांपर्यंत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
तसेच मुंबई महापालिकेतर्फे ठाणे, भिवंडी महापालिका आणि नगरपालिकांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातही २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

