कोंबड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटला 10 हजार पिल्लांची पळापळ

 कोंबड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटला  10 हजार पिल्लांची पळापळ

चीनच्या शेनडांग शहरात कोंबड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटला आणि कोंबड्यांच्या तब्बल 10 हजार पिल्लांची पळापळ झाली. ट्रक पडताच पिल्लं चहूबाजूला सैरावैरा पळत सुटली.

पूर्व चीनच्या बेनझाऊमधील शेनडांग प्रांतातील हायवेवर हा अपघात झाला. ट्रक उलटल्यानंतर आसपासच्या गावातील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पिल्लांची लूट करण्यास सुरुवात केली.

कोंबड्यांबाबतचं वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरलं आणि लोकांची संख्या वाढतच गेली. उपस्थितांचा आकडा पाहता पोलिसांचीही त्यांना थांबवण्याची हिंमत झाली नाही. हायवेवरुन जाणाऱ्या प्रवाशांनीही गाड्या थांबवून कोंबड्या उचलल्या.

ट्रक ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार कोंबड्यांची किंमत 7 हजार 800 डॉलर म्हणजेच सुमारे 5 लाख 15 हजार 129 रुपयांच्या घरात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *