नियोजित पत्नीकडे न्यूड सेल्फीसाठी तगादा, नकारामुळे नवरदेवाने मोडलं लग्न

नियोजित पत्नीकडे न्यूड सेल्फीसाठी तगादा, नकारामुळे नवरदेवाने मोडलं लग्न

सेल्फीची क्रेझ सर्वच स्तरामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. याच वेडातून ठाण्याच्या एका 33 वर्षीय नवरदेवाने आपल्या होणाऱ्या पत्नीकडे न्यूड सेल्फीची मागणी केली, मात्र तिने यास नकार दिल्याने तरुणाने थेट लग्न मोडण्याचं पाऊल उचललं.

ठाण्यातील जितेंद्रचं त्याच्या परिसरात राहणाऱ्या एका तरुणीशी लग्न ठरलं. साखरपुड्यानंतर एक दिवस अचानक त्याने भावी पत्नीकडे न्यूड सेल्फी पाठवण्याची मागणी केली. पतीच्या विचित्र हट्टामुळे धक्का बसलेल्या संबंधित तरुणीने तसं करण्यास ठाम नकार दिला.

मात्र यानंतरही वारंवार जितेंद्रने तिच्याकडे न्यूड सेल्फी पाठवण्याचा तगादा लावून धरला. आपल्या पत्नीचं ‘तसं’ रुप पाहण्याच्या वेडाने जितेंद्रला इतकं झपाटलं की त्याने पत्नीला लग्न मोडण्याची धमकी दिली. इतकंच नाही तर त्याने तरुणीच्या माता-पित्याकडे 3 लाखांचा हुंडा मागत सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या तरच लग्न करण्याचा निर्णय ऐकवला.

जितेंद्रच्या पावित्र्यामुळे संतप्त झालेल्या वधुपित्याने पोलिसांत धाव घेतली. हुंडाविरोधी कायद्याअंतर्गत जितेंद्रविरोधात तक्रार नोंदवून त्याच्यासह कुटुंबियांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *