जाळपोळ आणि हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या जनतेला शांततेचं आवाहन केले आहे.जाळपोळ आणि हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या जनतेला शांततेचं आवाहन केले आहे.
गुजरातमध्ये पटेल आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय.. पाटीदार नेता हार्दिक पटेल यांच्या अटकेनंतर अहमदाबाद, सूरत, राजकोट, मेहसाणासह अनेक शहरात जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्यात.. चार ते पाच शहरात जवळपास 50 हून अधिक गाड्या आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिल्यात. मेहसाणामध्ये गुजरातचे गृहमंत्री रजनी पटेल यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली.

