ओदिशात नक्षलवाद्यांचा हल्ला, तीन जवान शहीद, सहा जखमी

ओदिशात नक्षलवाद्यांचा हल्ला, तीन जवान शहीद, सहा जखमी

ओदिशात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बीएसएफचे तीन जवान शहीद झाले आहेत. तर सहा जवान जखमी आहेत. मल्कानगिरी जिल्ह्यात आज सकाळी हा हल्ला झाला.

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्याला लागूनच ओदिशातील मल्कानगिरी जिल्हा आहे. याभागात नक्षलवादी हे जवानांवर दबा धरून बसले होते. त्यांनी बीएसएफच्या ताफ्याला लक्ष्य करून हल्ला चढवला. नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणल्याने, बीएसएफचे तीन जवान शहीद झाले. तर सहा जवान जखमी झाले.

जखमी जवानांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं  आहे. तर या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांच्या शोधासाठी अतिरिक्त दल घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *