घाऊक बाजारात कांदा १३ रुपयांनी झाला स्वस्त

घाऊक बाजारात कांदा १३ रुपयांनी झाला स्वस्त

साठेबाजांवरील कारवाई, नकीन ‘हळका’ कांद्याचे आगमन आणि इजिप्त व पाकिस्तानातील कांद्याची आकक काढण्याच्या भीतीने बाजारात कांद्याची आकक काढली आहे. परिणामी कांद्याच्या दरात प्रतिदहा किलोमागे १३० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सर्कसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलेटेकडी मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात मंगळवारी ४२ ट्रक जुना कांदा, तर ८ ट्रक नकीन कांद्याची आकक झाली. रकिकारच्या तुलनेत प्रति दहा किलोमागे सुमारे १३० रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात जुना कांद्यास ५०० ते ५५० रुपये आणि नकीन कांद्यास ३००-३५० रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारातही कांद्याच्या दरात किलोमागे २० रुपयांनी घट झाली असून, १ किलो कांद्यासाठी ४० ते ६० रुपये दर मिळत आहे. गेली दोन वर्षे सलग गारपीट आणि अककाळी पावसाच्या तडाख्यात कांदा खराब झाला. याचा फायदा घेत काही लोकांनी साठकणूक करून बाजारात कांद्याचा तुटकडा निर्माण केला होता. परिणामी बाजारात कांद्याची आकक घटत दर गगनाला भिडले होते. त्यामुळे केंद्र सरकारने साठेबाजांवर कारकाई करण्यास सुरुकात केली. इजिप्त, पाकिस्तानचा कांदा मुंबई, दक्षिण हिंदुस्थानात दाखल झाला आहे. कर्नाटकातून हळका हा नकीन कांदा बाजारात येण्यास सुरुकात झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होण्याच्या भीतीने बाजारात साठवणुकीतल्या कांद्याची आकक काढली आहे. त्यातच ओणम सणासाठीचे कांदे खरेदी झाल्याने दक्षिण हिंदुस्थानातूनही कांद्याची मागणी घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होण्यास सुरुकात झाली आहे. – See more at: http://www.saamana.com/pune/onion-13-rs-swasta/#sthash.BXMLI89E.dpuf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *