इंद्राणीवर बहिणीच्या हत्येचा आरोप

इंद्राणीवर बहिणीच्या हत्येचा आरोप

स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणीला पोलिसांनी अटक केली आहे. 2012 मध्ये बहिणीची हत्या केल्याप्रकरणी इंद्राणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

इंद्राणीच्या अटकेने कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. 2012 मध्ये इंद्राणीने बहीण शीना वोराची हत्या केल्याचा आरोप आहे. शीना यांच्या मृतदेहाचे अवशेष रायगडजवळ आढळून आले होते.

इंद्राणीला पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं असता तिला 31 ऑगस्टपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे इंद्राणीसोबत तिचा ड्रायव्हर श्याम रायलाही अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *