बसंतीला लग्नाची मागणी घालण्यासाठी पाण्याच्या टाकीवर जाऊन हट्ट करणारा वीरु तुम्हाला आठवत असेल. पण चंद्रपूरमध्ये अशाच स्टाईलने आंदोलन करणारी एक बसंती आढळून आली आहे. मुलाचे कुटुंबिय लग्नाला होकार देत नाहीत म्हणून एका तरुणीने थेट घरावर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं.
दुर्गापूरमधल्या शक्तीनगर कॉलनीत 22 वर्षीय स्वाती वरखडे राहते. चार महिन्यापूर्वी या भागातील जावेद देशमुखशी तिचे प्रेमसंबंध जुळले. मात्र ऐनवेळी देशमुख कुटुंबानं लग्नाला नकार दिला. त्यामुळे मुलीनं थेट घरावर चढून आंदोलनाचा मार्ग पत्करला.
परिसरातील नागरिकांनी स्वातीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शोले चित्रपटातील वीरुच्या हट्टापायी बसंती आणि तिच्या मौसीने लग्नाला होकार दिला. आता जावेद देशमुखचे आई-वडील या प्रेमाला होकार देतात की नकार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

