निफाड तालुक्यात रानवडमधील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मोठा दरोडा पडला आहे. चोरट्यांनी तब्बल 14 किलो सोन्यावर डल्ला मारला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
बँकेत एकूण 75 लॉकर होते, त्यापैकी 44 लॉकर कटरने तोडून दरोडेखोरांनी सोनं लंपास केलं. विशेष म्हणजे बँकेत 14 लाख 67 हजारांची रोख रक्कम होती. परंतु या रकमेला हात न लावता चोरट्यांनी फक्त सोनं लुटलं.
आज सकाळी बँक उघडल्यावर बँकेत चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान लुटीचा आकडा हा एक कोटीच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करुन तपास सुरु केला आहे.

