नागपूरचे आमदार आणि नितीन गडकरींचे निकटवर्तीय कृष्णा खोपडे यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ज्या फोनवरुन खोपडे यांना धमकी आली तो फोन रेल्वेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानंच केल्याचं समोर आलं आहे.
खोपडे मुंबईहून नागपूरकडे जाण्यासाठी मुंबईच्या सीएसटी स्टेशनवर आले होते. फोन उचलल्यानंतर समोरच्या व्यक्तीनं खोपडेंना शिव्या देण्यास सुरुवात केली. दरम्यान, संबंधित व्यक्ती अकोला जिल्ह्यातील बीड गावचा असून त्यांचं नाव उत्तम खडसे असं आहे.
पोलिसांनी चौकशी केली असता आपण असा कोणताही फोन केला नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

