सौदी अरेबियाच्या एका महिलेने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टॉयलेटमध्ये बाळाला जन्म दिला. आज दुपारी दोनच्या सुमारास बाळाचा जन्म झाला.
अल्हागबानी हाया सौद ही 20 वर्षीय महिला एअर इंडियाच्या AI 921 या विमानाने हैदराबाद-मुंबई व्हाया रियाध जात होती. मात्र तिने मुंबईच्या विमानतळावरील रेस्टरुमच्या टॉयलेटमध्ये बाळाला जन्म दिला.
हाऊस कीपिंगची टीम आणि विमानतळ डॉक्टरांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि महिलेची सुरक्षित प्रसूती केली. आई आणि नवजात बाळाला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

