कोल्हापुरातील टोलवसुलीला पंधरा दिवसांसाठी आयआरबी कंपनीन दिलेली तात्पुरती स्थगिती आज संपणार आहे. त्यामुळं टोलवसुलीची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. याविरोधात शिरोली टोलनाक्यावर टोलविरोधी कृती समितीच आंदोलन करणार आहे.
दिवसभर त्या ठिकाणी थांबून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांना टोल द्यायचा नाही असं आवाहन करण्यात येणार आहे. जोपर्यंत पूर्णपणे टोल बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवू असा इशाराही टोलविरोधी कृती समितीन दिला आहे.
कोल्हापूर टोलप्रश्नासंबंधी 11 ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबइत बैठक झाली होती. त्यानुसार आयआरबीनं 15 दिवसांकरिता टोल वसुली थांबवली होती. मंगळवारी रात्री ही मुदत संपली. त्यामुळं टोल वसुली केली जाणार का? याकडं कोल्हापुरकरांचं लक्ष लागलं आहे.

