काँग्रेसचे माजी आमदार यांचं आज निधन झालं आहे. आजच म्हणजे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता. सकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झालं आहे.
मधुकर ठाकूर हे मागील ३ ते ४ वर्षांपासून आजारी होते. अलिबाग उरण मतदारसंघाचे ते माजी आमदार होते. झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य व नंतर आमदार अशी त्यांची राजकीय कारकिर्द आहे. २००४ ते २००९ या कालावधीत ते अलिबाग- उरण मतदारसंघाचे आमदार होते.
रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. आज दुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थिवावर आलिबाग तालुक्यातील सातीर्जे या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार होणार आहे
