पुण्यातला शिक्षक विद्यार्थिनीला म्हणाला, ‘तुला पैसेही देतो मार्कसही देतो फक्त शारीरिक संबंध ठेव’

विद्येचं माहेरघर असणाऱ्या शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. या घटनेनंतर पालक आणि विद्यार्थींकडून संताप व्यक्त होत आहे. एका शिक्षकानं विद्यार्थ्यासोबत अश्लिल भाषेत संवाद साधल्यानं काळं फासल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीशी अश्लील भाषेत हा शिक्षक संवाद साधत होता. त्यामुळे त्याच्या तोंडाला काळ फासण्यात आलं.

बारावीला मार्क वाढवून देतो आणि पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील असं या शिक्षकाने विद्यार्थीला सांगितलं. शिक्षकाकडून विद्यार्थिनीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करण्यात आली. याची माहिती संतप्त पालकांना कळताच त्यांनी शिक्षकाच्या तोंडाला काळं फासलं आहे.

विद्यार्थ्यांना ज्ञान आणि विद्या देणाऱ्या शिक्षकानेच अशा पद्धतीनं अश्लिल भाषेत विद्यार्थीनीसोबत बोलल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. या शिक्षकावर पालकांनी आरोप केला आहे. संतापलेल्या पालकांनी शिक्षकाच्या तोंडाला काळी शाई फासून ओढत पोलीस स्टेशनमध्ये नेलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *