पाकिस्तानात लष्कर जवान आणि चिनी इंजिनियर प्रवास करत असणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. बसचा भीषण स्फोट झाला असून यामध्ये आठ जण ठार झाले आहेत. यामध्ये चार चिनी इंजिनियर्सचा समावेश आहे. आईडीच्या सहाय्याने हा स्फोट घडवण्यात आला आहे. दरम्यान जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
या बसमध्ये दासू धरणासाठी काम करणारे चिनी इंजिनियर प्रवास करत होते. बसमध्ये जवळपास ३० इंजिनिअर आणि कामगार होते. जखमींपैकी काहीजण गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
