डेल्टा प्लसनंतर आता कप्पा व्हेरिएंटचा कहर, राजस्थानमध्ये सापडले ११ रुग्ण

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाचा करोनाच्या विषाणूंचे नवे प्रकार समोर येत आहेत. हा विषाणू म्युटेट होत असून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा प्रसार होऊ लागला आहे. आत्तापर्यंत करोनाच्या अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लस अशा प्रकारांची चर्चा असताना आता करोनाच्या कप्पा विषाणू (Kappa Variant) चे रुग्ण सापडू लागले आहेत. राजस्थानमध्ये कप्पा व्हेरिएंटचे ११ रुग्ण आढळले आहेत. राज्याचे वैद्यकीय व आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. याआधी उत्तर प्रदेशमध्ये करोनाच्या कप्पा व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले होते.

करोना विषाणूच्या कप्पा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या ११ रुग्णांपैकी चार जण अलवर आणि जयपूरचे, दोन बाडमेर आणि एक भिलवारा येथील आहेत. जनुकीय सर्वेक्षणनंतर या प्रकरणांची माहिती मिळाली, असे डॉ. रघु शर्मा म्हणाले. डेल्टा प्रकारापेक्षा कप्पा व्हेरिएंट कमी प्राणघातक आहे असे वैद्यकीय मंत्री म्हणाले. मंगळवारी राजस्थानमध्ये २८ नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात ६१३ उपचाराधीन रूग्ण आहेत.

यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये कप्पाच्या व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले होते. . राजस्थानमध्ये बोलताना आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मंगळवारी चोवीस तासांत करोनाचे २८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मात्र करोनामुळे राज्यात कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही. यासह, करोना व्हायरस संसर्ग झालेल्यांची संख्या ९ लाख ५३ हजार १८७ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ८,९४५ जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात सध्या ६१३ सक्रिय रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *