दिल्लीत ऑटोमधून ओढून महिलेवर कारमध्ये गँगरेप, ५ जणांना अटक

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा गँगरेपनं हादरलीय. दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलीय. मात्र गँगरेपच्या सर्व पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कालरात्री घडलेला हा प्रकार आहे. जेव्हा उत्तम नगरमध्ये राहणारी महिला आपल्या कामानं ऑटोनं डिफेन्स कॉलनीत आली होती. तेव्हा रात्री एका सेंट्रो कारमधील चार तरुणांनी तिला जबरदस्तीनं ऑटोतून ओढलं आणि कारमध्ये टाकलं. दक्षिणपुरी भागात नेवून कारमध्येच तिच्यावर गँगरेप केला. तिथं आधीपासूनच आणखी एक तरुण उपस्थित होता.

सर्व आरोपींनी महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिला डिफेन्स कॉलनी परिसरात फेकून दिलं आणि ते नराधम पसार झाले.

ऑटोचालकानं पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. कार नंबरच्या आधारानं आणि महिलेनं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केलीय.

पीडित महिलेला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्याक आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ती कारही हस्तगत केलीय ज्यात महिलेवर गँगरेप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *