दारूबंदी ठराव झाल्याने आता दारू विक्री बंद करा, असे सागंण्यासाठी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील महिला सरपंच सुजाता पवार कार्यकर्त्यांसमवेत गेल्या होत्या. तेव्हा गावठी दारू विक्री करणाऱ्या एका महिलेशी त्यांची जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेने सरपंच सुजाता पवार यांच्या दिशेने अॅसिड फेकले.
म्हैसगावचे ग्रामस्थ करणार दारूविक्रेतीचे पुनवर्सन
महिला सरपंचाच्या अंगावर अॅसिड फेकणाऱ्या दारूविक्रेत्या महिलेला दुसरा व्यवसाय सुरू करून देण्याचा निर्णय म्हैसगावच्या ग्रामस्थांनी आज घेतला. त्याला महिलेने तयारी दर्शवली आहे. पिठाची गिरणी किंवा अन्य उपजिविकेचे साधन उपलब्ध करून दिले, तर दारू विक्री बंद करण्याचे आश्वासन तिने ग्रामस्थांना दिले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये रविवारी गावात घडलेल्या घटनेचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आज या हालचाली झाल्या. रविवारी घडलेल्या घटनेनंतर आज गावात निधेष सभा घेण्यात आली. सरपंच सुजाता पवार, मंदा झावरे, अरुण पवार यांच्यासह जिल्हा दारूमुक्त कृती समितीचे अध्यक्ष बाबा सोनवणे हेही सभेला उपस्थित होते.