अंबरनाथमध्ये प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाची हत्या, घटना मोबाईलमध्ये कैद

अंबरनाथमध्ये प्रेमविवाह केल्याच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात घडलेला हा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.

विजय नवलगिरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो रिक्षाचालक होता. विजय याने ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमेतील एका मुलीशी प्रेमविवाह केला होता. अंबरनाथच्या बी केबिन रोड परिसरातील छाया अपार्टमेंटमध्ये तो पत्नीसह राहत होता. विजयची पत्नी ज्या परिसरात राहत होती, त्या भागातले काही तरुण विजयला आमच्या भागातल्या मुलीशी प्रेमविवाह का केला? असं म्हणत गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होते.

आज दुपारी ३.३० च्या सुमारास विजयच्या घरी ५ ते ७ तरुण आले आणि त्यांनी विजयला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला घराबाहेर आणत त्याच्या डोक्यात फरशी घालण्यात आली, त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड घालत त्याची हत्या करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *