शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये गुरुवारी रात्री ऑक्सिजनचा साठा संपल्याने रुग्णालय प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. गुरुवारी सायंकाळपर्यंत ऑक्सिजनचे टँकर येणे अपेक्षित असताना ते रात्री उशिरा पर्यंत पोहोचले नव्हते. त्यातच ऑक्सिजन घेवून येणाऱ्या टँकर चालकाचा संपर्क तुटला, मात्र रुग्णालयात 100 सिलेंडरचे बॅकअप असल्याने मोठे संकट टळले.
जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये गुरुवारी सायंकाळीपर्यंत येणारे ऑक्सिजन टँकर न आल्याने व त्यातच ऑक्सिजन टँकर घेऊन येणाऱ्या टँकर चालकाचा संपर्क तुटल्याने रुग्णालय प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र 100 सिलेंडर चे बॅकअप असल्याने मोठे संकट टळले. व या बॅकअप सिलेंडर वर तीन तास ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. अखेर रात्री 12 वा. ऑक्सिजन टँकर रुग्णालयात दाखल झाल्याने रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.
जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये 250 रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे रुग्णालयाला दररोज 8 मॅट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनची आवश्यकता असते. दरम्यान मंगळवारी सोळा मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन रुग्णालयातील टँकमध्ये भरण्यात आले होते. मात्र गुरुवारी सायंकाळी हा साठा संपत आला.
तीन तास या पर्यायी ऑक्सिजन सिलेंडरमधून ऑक्सिजन पुरवठा सुरू होता अखेर रात्री बारा वाजेच्या सुमारास ऑक्सिजन टँकर रुग्णालयात दाखल झाल्याने रुग्णालयाचे मोठे संकट टळले.
