देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात कोरोनाच्या बाधितांचा आकडा वेगात वाढत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. राज्यात आणखी एका गावात कोरोना स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना बुलढाण्यातील एका गावाची आहे. तिथे सामूहिक जेवणानंतर 93 लोकांना कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराची लागण झाली. ही बातमी समजल्यानंतर लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गाव एक कंटेन्मेंट झोन
जिल्हा प्रशासनाच्या अधिका्ऱ्यांनी 700 हून अधिक लोकसंख्या असलेले पोटा गाव कंटेन्ट झोन म्हणून जाहीर केले आहे. स्थानिक अधिकाऱ्ंयाच्या म्हणण्यानुसार, एप्रिलच्या सुरुवातीस येथे झालेल्या तपासणी शिबिरात 15 जण ग्रामीण भागातील लोक कोरोना संक्रमित झाल्याचे आढळले. त्यानंतर काही दिवसांनंतर झालेल्या दुसर्या शिबिरात 78 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले.
एकत्र जेणव कार्यक्रमाबाबत प्रशासन गप्प
राज्यात कोरोना काळात सरकारकडून कोविड नियम लागू करण्यात आले आहे. असे असताना एकत्र गाव जेवण कसे काय दिले गेले. स्थानिक प्रशासनाकडून याला परवानगी कशी दिली आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच याबाबत स्थानिक प्रशासनाकडून काहीही सांगण्यास नकार देण्यात आला आहे. एकाच गावात 93 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने गावाच आता कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आले आहे.
कोरोना चाचणी दिला जातोय भर
पोटा गावात आयोजित मेजवानीला हे सगळे लोक उपस्थित होते. त्या वृत्तानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली नाही. वास्तविक, कोविड -19च्या कोरोना रुग्णाच्या निधनानंतर नुकतेच खामगाव येथे मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी एका गावकऱ्याने सांगितले की त्या मेजवानीत बरेच लोक सहभागी झाले होते.
अधिकाधिक लोकांची कोरोना चाचणी घेण्यावर आता प्रशासनाचा भर आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड सेंटर येथे पाठवले जात आहे, तर लक्षणे नसलेल्यांना घरी क्वारंटाईन राहण्यास सांगितले गेले आहे. आरोग्य विभाग सर्व बाबींवर बारीक नजर ठेवून आहे.