राज्यात निर्बंध अधिक कठोर; लग्न समारंभासाठी नवे नियम

करोनाची साखणी तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १ मेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. अशातच लग्न समारंभ व राजकीय सभा, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
विकेंड लॉकडाऊन लागू झाल्यानंतर राज्यात लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता लग्न समारंभासाठी पाहुण्यांची संख्या निम्म्यावर आली आहे. आता फक्त २५ जणांच्या उपस्थितीत लग्न उरकावं लागणार आहे. तर, कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे.
हॉलवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण किंवा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. किंवा करोना चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट जवळ बाळगणे आवश्यक आहे. जर, कर्मचाऱ्यांचे लसीकरण व चाचणी झाली नसल्यास दंड आकारण्यात येणार आहे.
‘ब्रेक द चेन’च्या नियमांनुसार राजकीय सभांनाही परवानगी नाकारली आहे. तर, एखाद्या नियोजित निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घ्यायची असल्यास पक्षाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, सरकारच्या नियमांचे पालन करणं बंधनकारक असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *