पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी ‘मन की बात‘ हा रेडिओवरून जनतेशी संवाद साधण्याचा कार्यक्रम 30 ऑगस्टला होणार आहे.
पंतप्रधानांनी आज (शनिवार) ट्विटरच्या माध्यमातून आपण 30 ऑगस्टला (रविवार) रेडिओच्या माध्यमातून “मन की बात‘ या कार्यक्रमातून संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले. ‘मन की बात‘ कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी विविध विषयांचा समावेश करण्यात येणार आहे.
मोदींनी यापूर्वी काळा पैसा, शेतकरी, परीक्षा अश्या विविध विषयांवर ‘मन की बात‘या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी रेडिओद्वारे महिन्यातून एकदा किंवा दोनदा जनतेशी संवाद साधणार असल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान प्रथमच रेडिओवर ‘मन की बात‘ या कार्यक्रमातून एकत्र आले होते.

