जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होत नाही, तोपर्यंत अनवाणी चालणार असा निर्धार करणाऱ्या बलवंत कुमावत यांनी अखेर पायात चपला चढवल्या. शुक्रवारी पंतप्रधानांच्या भेटीने कुमावत यांची इच्छा पूर्ण झाली.
भैलवाडा तालुक्यातील कुमावत यांनी दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधानपदी विराजमान होत नाहीत आणि त्यांची भेट होत नाही, तोपर्यंत अनवाणी चालण्याची प्रतिज्ञा घेतली होती. शुक्रवारी पंतप्रधानांची भेट झाल्याने बलवंत कुमावत यांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांनी चपला घालून आपली प्रतिज्ञा मोडली.

