तब्बल 9 महिन्यांनंतर सुरु होणार पुण्यातील खासगी क्लासेस

कोरोनामुळे बंद असलेले पुणे शहरातील खासगी क्लास सुरु करण्याची परवानगी पुणे महापालिका आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे तब्बल ९ महिन्यांनंतर खासगी क्लासेस उघडणार आहेत. पुणे महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून खासगी क्लासेस सुरु करण्यास परवानगी दिली असून पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. शिक्षकांची कोरोना चाचणी, थर्मल गन, ऑक्सिमीटर, सोशल डिस्टन्सिंग हे बंधनकारक असणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर खासगी क्लासेस देखील बंद होते. केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये खासगी शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हळूहळू अनलॉकला सुरुवात झाली. अनेक गोष्टींमध्ये शिथिलता आणण्यात आली. काही ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी दिली गेली. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शाळा सुरु होती. पण क्लासेस मात्र अडचणीत आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *