धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीनं इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार

 धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीनं इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीनं इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार मुंबईतल्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली आपल्यावर २००६ पासून अत्याचार सुरु होते असं तिने तक्रारीत म्हटलंय. हे आरोप खोटे असून बदनामी करणारे आणि आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी असल्याचा दावा मुंडे यांनी केलाय.

धनंजय मुंडे यांनी माझ्याशी इच्छेविरुद्ध संबंध ठेवले. तुला बॉलिवूडमध्ये मोठ्या निर्मात्यांशी भेट घालून देईन आणि काम मिळवून देईन असे आश्वासन दिले असा आरोप रेणूनं केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *