माणगाव बायपास उड्डाणपुलाच्या गर्डरचे काम पूर्ण, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, पण उद्घाटनासाठी प्रतीक्षा कायम

मुंबई गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगाव बायपासवर असलेल्या मोठ्या उड्डाणपुलाचे गर्डर चढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता लवकरच बायपास सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्याने माणगाव येथे महामार्गावर तासंतास होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे मात्र यासाठी आणखी किमान दोन ते महिने वाट पहावी लागणार आहे. एलएन इन्फ्रा ही ठेकेदार कंपनी या बायपाससाठी युद्धपातळीवर काम करत आहे.

वाहतूककोंडीतून मोठा दिलासा

गणेशोत्सव ,दिवाळी, शिमगोत्सव, सुट्ट्यांचा कालावधी यामध्ये माणगाव येथे मोठी वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे प्रवासी पर्यटकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. दोन महिन्यानंतर बायपास सुरू झाल्यास या वाहतूककोंडीतून मोठा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे. महामार्गावरील प्रवास हा अधिक वेळेत व गतीने होणार आहे.

काम नियोजित वेळापत्रकानुसार सुरळीत पूर्ण

माणगाव बायपासच्या पूर्णत्वासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवासी वेळापत्रकावर कोणत्याही परिणाम होणार नाही अशा स्वरूपाचे मेगाब्लॉक घेऊन रेल्वे ट्रॅक वरून जाणाऱ्या उड्डाणपूलावर गर्डर टाकण्याचे अत्यंत जोखमीचे काम पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला उत्तम प्रकारे सहकार्य केले. त्यामुळे हे काम नियोजित वेळापत्रकानुसार सुरळीत पूर्ण झालं आहे. यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाची टीम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाची टीम यांच्या समन्वयाने हे काम 26 ऑक्टोबर पासून 4 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण झाले आहे. यासाठी यांत्रिक व तांत्रिक सगळी जय्यत तयारी ठेवून हे मोठं काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आता हा बायपास पुर्ण करून या मार्गावर वाहतुकीसाठी आवश्यक त्या चाचण्या झाल्यानंतर खुला करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *