पुण्यात खडकवासला धरणातून मोठा विसर्ग, एकता नगरी परिसरात सोसायट्यांमध्ये पाणी

गेल्या तीन दिवसापासून राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातळे आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात सुद्धा जोरदार पाऊस बरसत आहे. पुणे विभागाला हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.

पुणे ग्रामीण आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होऊन पाणी पातळीत लक्षनीय वाढ झाली आहे. त्यामुळे या चारही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तीन धरणांतून सोडलेले पाणी खडकवासला धरणात जमा होते. त्यामुळे खडकवासला धरणातून काल दिवसभरात विसर्गामध्ये टप्प्याटप्याने वाढ करण्यात आली. रात्री सात वाजता खडकवासला धरणातून तब्बल 35 हजार 510 क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात होते. आज सकाळी 10 वाजता हा विसर्ग 39 हजार 138 क्युसेकने वाढवण्यात आला आहे. हा विसर्ग यंदाच्या हंगामातील सर्वाधिक आहे.

खडकवासला धरणातून होत असलेल्या मोठ्या विसर्गामुळे मुठा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. नदीपात्राच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुठा नदीपात्रालगत असणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी परिसरात अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. तळमजला आणि पार्किंगमध्ये कमरेइतके पाणी भरले असून आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकड्या नागरिकांना बाहेर काढत आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे. धरणातून होणारा विसर्ग हा आवश्यकतेनुसार वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

काल दिवसभरात पडलेला पाऊस

 

  • खडकवासला धरणात 71 मिमी पाऊस
  • पानशेत धरणात 181 मिमी पाऊस
  • वरसगावमध्ये 165 मिमी पाऊस
  • टेमघर धरणात 186 मिमी पाऊस

 

बाधित होणारे गाव

 

  • नारायण पेठ, पुणे
  • विठ्ठलवाडी, पुणे
  • पुलाचीवाडी, पुणे
  • नारायण पेठ
  • कामगार पुतळा
  • शिवाजीनगर
  • कसबा पेठचा काही परिसर
  • बाधित होणारे पूल
  • बाबा भिडे पूल
  • विठ्ठल रखुमाई मंदिर व सिंहगड रोड परिसर
  • डेंगळे पूल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *